STORYMIRROR

Akshay Shinde

Tragedy

4  

Akshay Shinde

Tragedy

का तर मी मेलोय म्हणून?

का तर मी मेलोय म्हणून?

1 min
316

स्वताच काम असल्याशिवाय माझ्या दारात ढुंकूनही न पाहणारे आज का जमला आहात

का तर मी मेलोय म्हणून?

पाठिमागे नाही तर तोंडावर माझ्या अपयशांवर हसणारे तुम्ही ही रडताय

का तर मी मेलोय म्हणून?

आयुष्यभर मी मळकाच होतो अस्तित्वावर ही चिखल उडवलात आणि आज अंघोळ घालताय

का तर मी मेलोय म्हणून?

जुनेच असायचे माझे कपडे तेही फाडून टाकले आणि आज नवीन कपडे घालताय

का तर मी मेलोय म्हणून?

त्वेषाने तर जीवनाची राख झाली मग आज परत का जाळताय

का तर मी मेलोय म्हणून?

कधी शिळ्या भाकरीचा तुकडा दिला नाहीत आणि आज पंचपक्वान्न देताय

का तर मी मेलोय म्हणून?

माझ्या नावाला हसायचे ते प्रसिद्धी साठी आज माझ्याच नावाचा उपयोग करतात

का तर मी मेलोय म्हणून?

लोक तुम्हांला हसू नयेत म्हणून आज माझी सेवा करताय

का तर मी मेलोय म्हणून?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy