STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

काय घडलं

काय घडलं

1 min
255

पापणीला पापणी टेकत नाही ,

स्वप्न जागवे मजला झोप नाही ,

उसळते लाट गाज ऐकते,

चंद्र लाजतो तिथे ,

सागराच्या मिठीत शिरता ,

बेधुंद श्वासांना सुगंधीत करता,

काय घडलं त्या रात्रीला ,

अंधार दाटता मोगरा फुलला ,

शहारे लाजून लाजून विरता ...

आठवांचे धूके पसरता ...


दूर निघून गेलास तू सिमेवरती,

क्षण अधूरे मनाला बोचती ,

दिलेले ओंजळीत स्वप्न,

आठवणीत दिलेले क्षण,

लाल रंगात रंगलेला,

आठवतो प्रेमाचा गुलाब ,

नजरेने नजरेला दिला सुहास,

तु सोबतीला हवास,

कुस रात्रीची पलटता,

चांदण्याना हळूच आठवता ,

शहारे लाजून लाजून विरता...

आठवांचे धुके पसरता ...

पापणीला पापणी टेकत नाही ,

स्वप्न जागवे मजला झोप नाही ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance