आनंद
आनंद
शब्द गवसले छेडूनी छंद
भाव गुंफले मनीचे तोडूनी बंध
जुळूनी तुझ्या सुरात सूर
चौफेर दरवळत असे
परिमळ सुगंध
कधी फुलातील होई मकरंद
मनी कमान शोभे सप्तरंग
प्रीत माळली तुझी राजसा
स्फुरेल मनी आनंदी आनंद
श्वासात तू ध्यासात तू
अंतरीच्या स्पंदनात तू
स्वप्नी तुझ्या होई चित्त दंग..
तुझ्या सोबत असतांना होई मज
आनंदी आनंद..

