STORYMIRROR

vaishali vartak

Romance

4  

vaishali vartak

Romance

मी फक्त तुझी

मी फक्त तुझी

1 min
305

गुंतता हृदय हे

कधी अशी मी गुंतले

माझे मलाची कळेना

काय अशी तुझी जादु

केलीस तू मला उमजेना


आवडे रमणे तुझ्यात

तव विचाराचा ध्यास

होते बावरी तुला बघताच

सदा भेटण्याची आस


गंध विलसतो फुलात

 मी वसते तव अंतरी

एकरुप होते मनात

राहीन समीप निरंतरी


जैसे शशी येण्याची नभी

वाट पहाते चांदणी सदा

तीच ओढ मनी माझ्या 

मी फक्त तुझीच सर्वदा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance