STORYMIRROR

Sagar Nimbalkar

Romance

4  

Sagar Nimbalkar

Romance

नव्याने सावरावे

नव्याने सावरावे

1 min
503

मनाला माझिया मी, कितीदा आवरावे

जरासा तोल जाता, नव्याने सावरावे !!धृ!!


कुणाला दोष द्यावा, कुणाचा रोष घ्यावा

असो कोणी कसेही, हरेका हात द्यावा

मनाजोगे जरीही, कधी झालेच नाही

सुखाने योजलेले, मिळाले रोज काही


करावे कर्म मोठे, नि साधे वावरावे !!१!!


मलाही रोज येते, निनावी पत्र आता

पुन्हा मी आठवांच्या, जुन्या गावात जाता

फुलावे की झुरावे, मना तू सांग थोडे

कळेना सोडवावे, कसे हे द्वाड कोडे


मनाच्या काळजीने, कधी ना बावरावे !!२!!


तसेही पुण्य माझे, कधी कामी न आले

जरासे पाप होता, किती आरोप झाले

सुखाचा एक धागा, सुईने जोडताना

प्रपंचाचे किनारे, नदीला ओढताना


क्षणांच्या पालवीने, वयाला नावरावे !!३!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance