ओटी तुझी तूच भर
ओटी तुझी तूच भर
1 min
378
दुसऱ्याला कोसून अर्थ नाही
आपलीच घाई झाली म्हणायची
कळालं आई बापाला एकदाचं
पोर कोपऱ्यात बसून का रडायची
इच्छा आकांक्षा होत्या तिच्याही
स्वप्नांना फुटावी नव्याने पालवी
दुःख कधी झेपलं नाही अन
सुखाची मागणी होती अवाजवी
काय करावं अशावेळी म्हणून
आई बापाच्या कलाने घेतलं
वेळेआधीच फुलणं फुलाचं
निष्पाप कळीच्या जीवावर बेतलं
सोडवणं तिला रूढी परंपरेतून
अखेर, कुणालाही जमलं नाही
देवाघरी गेली ती एवढंच कळालं
बाकी काहीच कळेना कुणालाही
फुटतील टाहो, ओलावतील कडा
याउपर काय केलं कुणी आजवर
माफ कर पोरी पुन्हा एकदा
आता ओटी तुझी, तूच भर
