हिरव्या पानात प्रेम कविता
हिरव्या पानात प्रेम कविता
हिरव्या पानात
गर्द रे राईत
आलास घेवून
मला गारव्यात....
मन माझे आज
वाहिले रे तुला
फिरवी साजना
धुंदीत हो मला.....
हत हात धरी
कमरेत मस्त
कर रे घालूनी
झालास तू चुस्त,..
मन भरून मी
पाहते रे तुज
गाऊ प्रेमगीत
साद घाली मज....
हिरव्या या रानी
मी मस्त सजली
तुझ्याच प्रेमाची
धुंदी रे चढली.....
प्रीतवेडी झाले
तुझ्यासाठी मी रे
मनी मोर नाचू
लागला छान रे......

