STORYMIRROR

Anup Salgaonkar

Romance

4  

Anup Salgaonkar

Romance

मोतीमाळ

मोतीमाळ

1 min
477

उमलत्या नव्या क्षणांना 

आहे आधार भावनेचा

बांधली ही मोतीमाळ

जी सांधणारा हात तुझा


एक मोती लाख सुखाचा 

एक अतीव दुःखाचा 

धागा जोडू पाहतो

एक बंध प्रेमळ मनाचा


सगळे तुझ्याच आवडीचे मोती

कसे एकसंग नांदत राहती

तुझ्या स्पर्शाच्या रंगात

दुधाळी शुभ्र रंगून जाती


स्वतंत्र आहे प्रत्येक मोती

आपुलकी ही जपू पाहती

हेवे-दावे, रुसवे फुगवे

ज्यांना स्पर्धा माहितच नाही


तुझ्या नजरेची जादू होते

माळ ही चमकत राहते

वेधून घेते सगळ्या नजरा

घायाळ मनाचा ठाव घेते


काय म्हणू या माळेला...?

जी गळा घातली

की श्वास होते

तू असण्याचा भास होते

एकटेपणी साथ होते

दुःखाचा आधार होते

कधी सांडलाच...

मोती डोळ्यातून

की टिपणारा

तुझाच हात होते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance