"पाऊस"
"पाऊस"


'पहिला पाऊस' घेऊन आला
गंध ओल्या मातीचा,
बेधुंद झाला वारा
आणि धुंद झाल्या दाही दिशा...
वाटलं हात पकडून तुझा
चिंब चिंब भिजावं,
अचानक आलेल्या या पावसात
वेडं वेडं होऊन नाचाव...
हा बेभान वारा
अगदी तुझासारखाच वाटतो,
पावसाच्या प्रत्येक सरी सोबत
अचानक येऊन बिलगतो...
विजेच्या प्रत्येक गडगडाटात
माझी स्पंदन वाढतात,
तू हात पकडल्यावर
अगदी शांत होतात...
हा वेडा पाऊस
आपल्या प्रेमाचं गुपित होऊन जातो,
पण माहीत नाही का,
पण माहीत नाही का
कधी कधी डोळ्यांतून बरसतो
कधी कधी डोळ्यांतून बरसतो....