पाठवण
पाठवण

1 min

145
एव्हडीशी ती पोर,कलाकलाने वाढली
जशी वाढे चंद्रकोर..
आज चढली बोहल्यावर,चाले मनी घालमेल
भरुनी आला तिचा ऊर...
मोठी विचित्र ही स्थिती,
ज्या बाबाने शिकविले,बोट धरुनी चालायला
आज त्यानेच सप्तपदीसाठी,हात परक्याला सोपविला...
कन्यादानाचीही वेळ, सारा आनंदी आनंद
आला मांगल्याचा क्षण,
भोळ्या बाबालाही वाटे
होते पुण्याची साठवण...
हा तर निसर्गनियम-
कळी वेलीवर राही उमलेपर्यंत
होता तिचे सुंदर फुल ,
होई देवास अर्पण...
आला विरहाचा क्षण-
कंठी हुंदका दाटला,माय समजावे बापाला
हीच आहे जनरीत,करा मायेने पाठवण
लेक चालली सासरा, बाप सैरभैर झाला,
भरल्या डोळ्यांनी , आसवांसावे घरी आला...
भरल्या डोळ्यांनी आसवांसावे घरी आला...