चांदणे
चांदणे

1 min

475
मीच तुझी,
प्रित तुझी...
सारे काही जादुई...
माझी मी ही..उरले नाही..
तुझीच झाले कधी, कळले नाही...
नजरेस तुझ्या,नजर मिळावी
स्वप्ने सारी हकीकत व्हावी..
हात तुझा, हाती घ्यावा
अन् शुभ्र तारा साक्ष व्हावा...
अंतरीच्या आर्त हाका,
कानी याव्या...
जणू सागराच्याही लाटा,
स्तब्ध व्हाव्या...
स्पर्श होता तुझा,
शब्द झाले मुके...
गर्द काळ्या नभी,
दाटले चांदणे....