माय
माय
1 min
41
माय गर्भ वाढवते ,नऊ महिने दिस नऊ
माया तिची असते,दुधावरली साय मऊ
बाललीला पाहताना,दिस तिचा मावळताना
थकलेले हात भरवि,आधी घास बालकाला
बाळ दूरदेशी जाया,निघे विद्या शिकायाला
पाणावल्या नयनांना दिसे,पाठमोरी अंधुक काया
गाय हंबरठा फोडी,वासराला ती बोलवी
अंधारल्या पावसात,तगमग तिची व्हावी
पाय फुटावे वासरा,वेडे धावत सुटावे
नवि हिरवाई पाहण्या ,दूर काननी भटकावे
माय उंबरठ्यातुन ,पाही तिची धडपड
तिला गोंजारून सांगे,बाई त्रास तू आवर
येई वासरू तुझे ग,दूर जाऊनि परत
सापडेल त्याला वाट,घनदाट माळातुन
दुःख तुझे माझे बाई ,किती सारखे सारखे
काळजीने बालकाच्या, जीव तीळं तीळं तुटे....