STORYMIRROR

Sonali Gadikar

Romance

4  

Sonali Gadikar

Romance

"प्रेम"

"प्रेम"

1 min
482

तुझे प्रेम म्हणजे जणू

मुरलेल्या लोणच्यासारखे

कितीही जुने झाले तरी

मनाला चविष्ट वाटण्यासारखे


तुझे प्रेम म्हणजे जणू

आकाशातील चंद्र सूर्य तारे

युगानुयुगे येत राहतील पण

आभाळात नेहमीच चमकणारे


तुझे प्रेम म्हणजे जणू

कोसळणाऱ्या धबधब्यासारखे

स्वच्छ, शुभ्र, वेगाने वाहणारे

प्रेमळ प्रियकरासारखे


तुझे प्रेम म्हणजे जणू

चंद्राची शीतल छाया

भुरळ घालते माझ्या मनाला

प्रेमाची अद्भूत माया


तुझे प्रेम म्हणजे जणू

हवीहविशी बेचैनी

जितका अधिक दूर तू

असतोस माझ्या जवळ मनी


तुझे प्रेम म्हणजे जणू

न संपणारी हुरहूर

देशील माझी साथ जीवनी

जाऊ नकोस कधीही दूर


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance