STORYMIRROR

Sonali Gadikar

Abstract

4  

Sonali Gadikar

Abstract

मृत्यूची चाहूल

मृत्यूची चाहूल

1 min
345

आला अंगावर शहारा

विचार आला मनात

होतील अनंत वेदना

की जाईल मी क्षणात??


जगण्याचा मोह सुटेना

थकले जरी शरीर

होईल काय मी नसतांना

वाटे मनाला हुरहूर


राहतील का सारे मिळून

माझे आप्त स्वकीय?

विसरतील का मजला सहज

की करतील हाय हाय?


रीत जगाची न्यारी

असतांना नसते किंमत

गेल्यावर आपण स्मरतो

परी असावी मनी हिंमत


आहे जोवर जीव खुशाल

त्याची करा रे सेवा

मग मिळेल आशिर्वाद

जीवनी मिळेल मेवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract