STORYMIRROR

Sonali Gadikar

Others

3  

Sonali Gadikar

Others

नवे युग

नवे युग

1 min
485

धावपळीच्या या जीवनात

कुणासाठी कुणाला नाही वेळ

आपले, परके, चांगले, वाईट

नाही कशाचा कशाला ताळमेळ


सोशल मीडिया वाटतो जवळचा

दिवस असू दे किंवा रात्र

आई बाप बहीण भाऊ

सारेच दूर झाले मात्र


येता जाता उठता बसता

मोबाईल असतो सतत हातात

जवळ असून बोलायचं नाही

काहीही जरी असले मनात


विज्ञानाची प्रगती झाली

आपली झाली अधोगती

संमोहित केले तंत्रज्ञानाने

गमावून बसलो आपली मती


का असे झालो आपण

जरा याचा करा विचार

नाती जपा अनमोल ही

विसरू नका सदाचार


Rate this content
Log in