" आगमन श्री गणेशाचे "
" आगमन श्री गणेशाचे "
क्षण आनंदाचे
सूर भक्तिभावाचे
होणार थाटामाटात
आगमन श्री गणेशाचे
ढोल ताशांच्या गजरात
येणार माझा गणराया
देणार सुख अमाप
दुःखाचे निवारण करावया
येणार वाजत गाजत
मुर्ती ती साजिरी गोजीरी
हारफुलांच्या करून माला
सजणार आता घरोघरी
करतील जयघोष गणेशाचा
नाचतील सारे बेधुंद
विसरून सारा भेदभाव
व्यक्त करतील आनंद
असेल नैवेद्य लाडुचा
पेढ्यांचा नि मोदकाचा
होइल सुरात गजर
टाळ्यांचा नि स्तोत्रांचा
रंगतील खेल स्पर्धांचे
जमतील सारे आनंदाने
मिळून करूया स्तवन
राहू गुण्यागोविंदाने
घेऊया शपथ एकतेची
गणरायाच्या साक्षीने
आली कितीही संकटे
करूया मात एकजुटीने
देताना निरोप बाप्पाला
डोळ्यांची कडा ओलावते
पुढच्या वर्षी लवकार या
समजूत मनाची मी घालते.
