स्त्री
स्त्री
1 min
264
कधी माता म्हणून, तर कधी भगिनी म्हणून
कधी मैत्रीण म्हणून, तर कधी मुलगी म्हणून
सर्वांना केवळ आनंद देणारी
स्त्री ही आजही का अबला ठरली
कधी द्रौपदी तर कधी मिरा म्हणून
कधी अनुसया तरी कधी सीता म्हणून
दुसऱ्यांसाठी सदैव त्याग करणारी
स्त्री आजही का अबला ठरली
कधी राणी लक्ष्मीबाई तर कधी सरोजिनी म्हणून
कल्पना चावला म्हणून तर कधी किरण बेदी म्हणून
देशाची मान गर्वाने उंचावणारी
स्त्री आजही का अबला ठरली
कधी मानवासाठी तर दानवासाठी
वेळ पडली तर देवासाठी देखील
संघर्ष करून संकटांना सामोरी जाणारी
स्त्री आजही का अबला ठरली
