पहिलं प्रेम
पहिलं प्रेम
1 min
343
समुद्रकिनारी हळुवार चालतांना
हात तुझा माझ्या हातात
सुंदर ती नारंगी संध्याकाळ
गुंतले वेडे मन तुझ्यात
ओल्या वाळूवर चालतांना
प्रश्न असंख्य उरात
तुझ्या डोळ्यांची जादू होती
की प्रेमाची होती ती सुरुवात
प्रेमातील धागे विणातांना
सुखदुःखाचे रंग जीवनात
सोबत करूया सदैव आपण
सुखात असो वा दुःखात
तो दृढ विश्वास अनुभवताना
भानावर आले मी क्षणात
कळून चुकले होते मजला
माझा श्वास होता तुझ्या श्वासात
जीवनातील प्रवास करतांना
मिळून चालुया ही पायवाट
पृथ्वीवरच नव्हे तर साथ आपली
सोबत असावी स्वर्गात
