STORYMIRROR

Sonali Gadikar

Inspirational Others

3  

Sonali Gadikar

Inspirational Others

कोरोनाचा उच्छाद

कोरोनाचा उच्छाद

1 min
244

कोरोनाने कहर केला

साम्राज्य पसरविले जगावर

न दिसणाऱ्या विषाणूचे

राज्य चाललंय पृथ्वीवर


असंंख्य जीवितहानी झाली

कित्येकजण आले रस्त्यावर

आबाल वृद्ध लहान थोर

जगत आहेत केवळ आशेवर


कुटुंंबातील आधार गमावला

अश्रु झालेय अनावर

पाहून त्यांची दुरावस्था

जीव झालाय सैरभैर


घरातच कैद झालाय माणूस

जीवावर झालाय उदार

यातूनही मार्ग सापडेल

विश्वास आहे विज्ञानावर


शाळा महाविद्यालये बंद 

बंद झाली मंंदिरे

स्वरक्षण करण्याकरिता

बंद झाली घरेेदारे


पोलीस डॉक्टर समाज सेेवक

अंशतः झाले परमेश्वर

जीव साऱ्यांंचा वाचविण्यासाठी

ते असतात सदैव तत्पर


नाव पैसा प्रासिद्धी धन

आज नाही शिखरावर

जान है तो जहाँन है

इतिहासाच्या मुखपृृष्ठवर


मास्क लावा हात स्वच्छ धुवा

सुरक्षित राखा अंतर

करा शासनाची मदत

जीवाला जपा निरंतर


ठेवा विश्वास आणि हिंमत

मानू नका कुुणीही हार

हरवूया कोरोनाला

करूूूया मिळूनी शतदा प्रहार


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational