मनभावन साजणा
मनभावन साजणा
तुझे मोहक हास्य
नयनात अपार प्रीती
वाटे तुझीच व्हावे
हळुवार फुलावी नाती
न बोलता समजावे
भाव मनातील हळवे
समजून घ्यावे शब्द
अबोल प्रेम कळावे
भावना व्यक्त व्हावी
राहून तुझ्या मनी रे
अगणित आनंद मिळेल
त्यावेळी तत्क्षणी रे
देशील ना मज साथ
वळणावर आयुष्याच्या
मी तुझी तू माझा असशील
सोबती असू क्षणांच्या.....

