प्रित बावरी
प्रित बावरी
कृष्णा तुझ्या बासरीचे
स्वर येता कानात
तू जवळ असल्याचा
भास होतो क्षणात!!१!!
तुच माझा कृष्ण
मीच तुझी राधा
तुझ्या माझ्या मिलनात
कसली रे ही बाधा!!२!!
माधवा तुझ्या बासरीचे
स्वर आहेत गोड
वाट नको अडवू माझी
पदर माझा सोड!!३!!
दही-दुध खाऊन माझे
लावी जिवा घोर
म्हणतात साऱ्या गौळणी
तुला कापळी चोर!!४!!
देवकीचा तू बाळ
पाजला यशोदेने पान्हा
सुदामाचा तू मित्र
नंदलालाचा तू कान्हा!!५!!
मी गौळण राधा लाजरी
तुला शोभुन दिसे साजरी
कृष्णा तुझ्या प्रेमासाठी
मी झाली रे 'प्रित बावरी'!!६!!

