STORYMIRROR

Manisha Patwardhan

Romance

4  

Manisha Patwardhan

Romance

व्हॅलेनटाईन डे

व्हॅलेनटाईन डे

1 min
209

आई वडिलांनी पसंत केले

नाही कधी गुलाब दिले घेतले

तोच होता ना , आमचा फन डे

कशाला हवा दरसाली rose day ?


लग्नात गुरूजींनी सांगितलं खरं

" नाती चरामी " त्या आणाभाका बरं !!

कोणताच आम्हाला प्रश्न न पडे

कशाला हवा तो propose day ?


जे मिळालं ते , घरात वाटून खाल्लं

त्यातच सारं गोड कीं हो मानलं

नव्हंते हो खाण्याचे वेगवेगळे फंडे !!

कसा हो असतो तो chocolate day ?


लपंडाव , हुतूतू , विटीदांडूचा खेळ

 भातुकलीला दीला भरपुर वेळ

बाहुल्यांसाठी नव्हतो , कधी आम्ही वेडे

आज कशाला समारंभ , तो Teddy day ?


दिल्या घेतल्या वचनांना नेहमीच जागलो

तसेच आम्ही आयुष्यात नित्यनेमे वागलो

विश्वास होता एकमेकां , त्याच्या संकटात मी पुढे

एकच साजरा नाही केला कधी Promise day !!


फिरलो नाही कधीच त्या झाडां भोवती

नेहमीच होतो एकमेकांचे सोबती

झालो नाही निलाजरे , पाळले घरचे फंडे

नाहीच आम्ही उतावळे !! कशाला तो Hug वा Kiss day


आयुष्यात संसाराला केली सारी वणवण

तरीही आहेच हो आमचे सुखाचे जीवन

आनंदाचे रोजच गातो आम्ही सूर चढे

एकच दिवस नाही अमुचा Valentine day


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance