STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

4  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Romance

प्रिया आज माझी..

प्रिया आज माझी..

1 min
218

प्रिया आज माझी तुझी होऊ दे रे भेट,

दिनरात झुरते पाहते चातकावनी वाट ...


दिले होते आज मला,तू भेटीचे वचन,

वाट तुझी पाहती किती,माझे हे लोचन...


जळतो रे आत्मा माझा,या विरहात,

बसलास करुनी घर,माझ्या ह्रदयात...


सांग कधी घेशील,मला तू मिठीत,

आनंदून होईन वेडी,तुझ्या रे भेटीत...


किती वाट पाहू प्रिया,अंत नको पाहू,

अधीर झाले मन,नको दुःख मला देऊ...


कशी राहू एकटी मी,झुरत दिनरात,

प्रिया तुझा हात हवा,माझ्या रे हातात...


करशील त्रूप्त कधी,अत्रूप्त आत्म्याला,

क्षणोक्षणी झुरते मी,भेटायास प्रिया तुला...


तुझ्या मिलनाची मज,लागली रे आस,

तुझ्यासाठी थांबला प्रिया,माझा हा श्वास...


अशी कशी तू रे,जादू माझ्यावर केली,

तुझ्यासाठी कान्हा,राधा आतूर ही झाली...


आज तुझ्या मिठीत,झाले मी रे तुझी,

हौस सारी कर पुरी,प्रिया आज माझी...!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance