STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Romance

4  

श्रुती दिवाडकर

Romance

नातं तुझ नि माझं

नातं तुझ नि माझं

1 min
291

नातं तुझं नि माझं

जणू अग्नी विस्तवासारखं 

होरपळून तर जातो त्यातून

पण तळपतो सूर्यासारखं


नातं तुझं नि माझं

जणू चंद्रकोरीसारखं

कलेकलेने वाढून

तेज आल्यासारखं


नातं तुझं नि माझं 

जशी निरंजनाची मंद वात

तेवत राहते ती अखंड 

अन साथ देते तासंतास 


नातं तुझं नि माझं 

जणू दोन नयनासारखं 

भेटत नसले तरीपण 

देतात एकाच वेळी साथ 


नातं तुझं नि माझं 

जणू सागर नभासारखा 

स्पर्श करत नाही तरीपण 

वाटतं आभासासारखं


नातं तुझं नि माझं 

आहे फक्त दोघांपुरतं 

जगावेगळं हे नातं 

लोकांना न कळण्यासारखं 


नातं तुझं नि माझं 

कसं स्विकारायचं हे कसं

तू अन मी वेगळे असूनही 

एकरूप असल्यासारखं 


तू अन मी वेगळे असूनही

एकरूप असल्यासारखं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance