पारिजातक फुलला दारी
पारिजातक फुलला दारी
पारिजातक फुलला दारी
सडा पडला त्याचा शेजारी
दरवळली फुले अंगणी
सुवास सुटला सर्व दारी
मंद गंध दरवळतो तो
पहाटेच्याच प्रहरी
नकळत तुज्या आठवणीत
गुंग करतो मज त्याच क्षणी
माझे तुझ्यावरील प्रेम
निःशब्द करते मला
सुवास जातो तुझ्या दारी
तेच सांगावया तुला
सडा केवढा पडला त्याचा
जणू मोती पोवळ्याच्या राशी
तेच पाहण्यासाठी येशील तरी
याची वाट पहाटे मी दारी

