STORYMIRROR

श्रुती दिवाडकर

Romance

3  

श्रुती दिवाडकर

Romance

तू अन् पाऊस

तू अन् पाऊस

1 min
255

तू अन् पाऊस 

सारखेच वाटतात मला


पावसाची कशी वाट बघतो चातक 

तशी वाट पाहायला लावतो तू मला 


कोकिळेची कुहू कुहू चाहूल देते पावसाची 

तशी तुझी आठवण ओढ लावते तुझ्या येण्याची 


मातीत मिसळून सुगंध देतो तू धरणीला 

तशी तुझी मिठी मद मोहक करते मला 


मोराचे थुई थुई नाचणे साक्ष देते प्रथम पाऊसाची 

तुझी माझी भेट पण अशीच असते ना प्रीतीची 


पाऊसाची रीप रीप साथ देते धरणीला 

तुझ्या प्रेमाची पण साथ हवी साता जन्माला 


पाऊसाची ती मस्त गुलाबी थंडी काटा आणते अंगावर 

तूझ्या माझ्या स्पर्शाची उब देते सर्वांगावर 


आणि म्हणूनच 


तू आणि पाऊस 

सारखेच वाटतात मला 

तुम्ही आल्याचा आनंद मोहून टाकतो मला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance