STORYMIRROR

Krantdarshi Mirajkar

Romance

4  

Krantdarshi Mirajkar

Romance

तू अशीच जवळी राहा...

तू अशीच जवळी राहा...

1 min
308

तू अशीच जवळी राहा,

साखर पहाटी, मंद संध्याकाळी,

तू अशीच जवळी राहा,


पणतीची ज्योत बनुनी,

तीमिराला उजळीत,

तू अशीच जवळी राहा,


ग्रीष्मातल्या गर्म दुपारी,

हलकीशी झुळूक बनुनी,

तू अशीच जवळी राहा,


वर्षातल्या मेघांमधली,

कडाडणारी वीज बनुनी,

तू अशीच जवळी राहा,


श्रावणातल्या पावसासारखी,

ऊन सावलीचा खेळ बनुनी,

तू अशीच जवळी राहा,


हेमंतातल्या पहाटेसारखी,

थंड गुलाबी हवा बनुनी,

तू अशीच जवळी राहा...


రచనకు రేటింగ్ ఇవ్వండి
లాగిన్

Similar marathi poem from Romance