धुकं
धुकं
या धुक्याचा स्पर्श,
जसा- 'आभासी' तनाला...,
तसाच तू जवळ असतोस ,
वेड्या मनाच्या...!!!
दाटुनी धुके येता ,
अस्पष्ट सारं होतं .
तुझ्या आठवणी जाग्या;
अन धुंद मन होतं !
आठवांचे गाव आणि,
झुळझुळणारा झरा .
झुळझुळणाऱ्या पाण्यामध्ये,
साजण माझा उभा...!
चेहऱ्यावरचं हसू रांगडं,
अन मर्दानी ताठा...!
डोळ्यांनीच करी इशारा,
आणे अंगावर शहारा...!
कसा केलास इशारा असला?
मी इतकी गुरफटले ;
माझ्या साऱ्या अस्तित्वालाच,
'धुकं' आज समजले...!

