बहरला प्रेमऋतु
बहरला प्रेमऋतु
निसर्गऋतुंचे सोहळे
नानाविविध रंगढंग
बहरला प्रेमऋतु हा
पसरला नवा उमंग
करूया जल्लोषाने
साजरा हा प्रेमरंग
हात घेऊनी हातात
सख्याचा धरू संग
गुज प्रीतीचे करूया
दूर पाखरांच्या रानी
बासरीचे सप्तस्वर
पडती सुरेल कानी
निसर्गाच्या कुशीत
तू राजा न् मी राणी
नाचू खेळू न् बागडू
ओठांवर गोड गाणी
गुंग होऊ प्रेमलापात
नसेल जगाचेही भान
माझ्या प्रेमाचा स्वामी
तुझे या हृदयात स्थान

