STORYMIRROR

Padma Nagdeve

Romance

4  

Padma Nagdeve

Romance

थांब जरा प्रभाकरा

थांब जरा प्रभाकरा

1 min
254

थांब जरा प्रभाकरा 

चंद्र जागा नभातला,

धुंद मनी स्वप्नात तुझ्या

जीव माझा गुंतावला ll

रात्रीस मधुर चाफ्यामधूनी

गंध मोहून टाके मनाला

गंध तुझा मिळणार मला 

सुगंधनाऱ्या फुलातला ll

करपाश रेशमी स्वप्नामध्ये

कळी उमलली गालावरची

स्पर्श तुझा मिळणार मला 

नाचणाऱ्या मनातला ll

रिमझिम पाउस रेशीम धारा

मनाला भिजवी एक सारखा

संग तुझा मिळणार मला

दोन वेड्या जीवातला ll

होऊनी स्वार घोड्यावरती

भास्कर आला अवती भवती

रंग तुझा चढू दे मला

प्रितीच्या रंगातला ll


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance