हे प्रेम माऊलीचे
हे प्रेम माऊलीचे
कसे मी ऋण फेडू, या जीवनी आईचे
संपेल ना कधीही हे प्रेम माऊलीचे
हे नको मज ऐश्वर्य, तुझा बाळ चुकले मी
काळाच्या अंधारात,प्रेमाला मुकले मी
ओढून घेतले मी, हे दुःख दारिद्र्याचे ।।
सर्वाहुनी निराळे, आईचे प्रेम बाई
ममतेस दुरावून, अभिशाप भोगते मी
मजकडे अफाट वैभव, परी मोल न दुधाचे ।।
यासाजिऱ्या क्षणाला, ना दवडणार आता
वात्सल्य माऊलीचे ना विसरनार आता
चरणात अर्पिले मी, हे पुष्प सुमनांचे ।।
