श्वासात मराठी
श्वासात मराठी
श्वासात मराठी ध्यासात मराठी
आभाळ निळेभोर मज वाटते मराठी ll
दऱ्याखोऱ्यात गर्जते आवाज तुतारीचे
माझ्या कानात गुंजते अभिमान मराठीचे ll
दोन हातांची टाळी वाजवी शिवारात माळी
रंगातरंगले मराठीच्या लावुनी टिळा कपाळी ll
बहुसंस्कृती मराठीने पाहिल्या
माणुसकीच्या गाथा मराठीने गायिल्या ll
