STORYMIRROR

Bharati Sawant

Romance Others

4  

Bharati Sawant

Romance Others

प्रेमालाप

प्रेमालाप

1 min
198

ओलांडूनी माप सासरचे 

आली सखी माझ्या घरा

तुझे हसणे माझे जगणे 

झालाय पावन हा उंबरा 


तुझ्या प्रसन्नशा वदनाने 

जीवनात वसंत बहरला 

हवाहवासा वाटे सहवास

सारा मांडवच गहिवरला


येताच तू माझ्या अंगणी

प्राजक्ताचा पडला सडा 

दारातला उंच पिंपळ हा

स्वागताला स्तब्ध खडा 


आयुष्याचे होई सार्थक 

दिलेस मज सुखाचे दान 

सुसंस्कारांच्या शिदोरीचे 

करतो तुजसवे मी पान 


सप्तपदींच्या वेदीवरून 

तू सौभाग्यकांता झाली

करू मिळूनी प्रेमालाप 

मजसवे सुखात न्हाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance