शीर्षक :रेशीम बंध
शीर्षक :रेशीम बंध
रेशीम स्पर्श तुझ्या हातांचा
जणू अलवार मोरपीस फिरते
आवेगाने तुझ्या मिठीत येण्यासाठी
अंग अंग पुलकित रे होते...
प्रीतीच्या गंधाने तुझ्या
आठवणी होतात जाग्या
रेशीम बंधाचा बांधला गेला
आपल्यात तो अतूट धागा....
स्वप्न उरी बाळगले सदैव
तुझ्यासवे चांदण्यात शांत पहुडावे
हळुवारपणे जवळ घेऊनी
अधरावर तू मज चुंबावे.....
गंधाळलेल्या त्या प्रत्येक रातीचा
चंद्रमा असावा साक्षीला
तुझ्या -माझ्या या प्रेमातला
उत्कट क्षण यावा बहराला....
हे आपुले नाते जन्मांतरीचे
कुपीत दडलेल्या सुगंधी प्रीतीचे
सात जन्माकरिताच जणू बांधले
तुझ्यासाठीच मी आहे रे जन्मले....
नकोस कधी करू माझी अवहेलना
निरंतर मिळू दे तुझा सहवास..
मीच तुझी राहावी जीवनसंगिनी
प्रेम येऊ दे आपुले नित्य बहरास....

