STORYMIRROR

Bharati Sawant

Romance

4  

Bharati Sawant

Romance

प्रेमकविता

प्रेमकविता

1 min
245

पाहिले तुजला प्रिये

रूजले मनात गाणे

प्रीतीच्या हिंदोळ्यावर

गातेस अलवार तराणे


मिटूनि घेतलेस सखी

डोळ्यांत अश्रुंचे मोती 

तुला पाहताच प्रिये मी

विसरलो नाती गोती


रुप यौवन राणी तुझे 

आलेय कसे गं भराला

मिटल्या पापण्यांतूनी

गीत उमटलेय सुराला


एकटक पहात बसता

लाजूनि झुकली मान

सखे तव साजशृंगाराने 

गाठलीय पहा कमान


रमलो तव मिलनात

टिपले लावण्य नेत्रांनी

मेघ ओथंबले हळुवार

साहिली तुझ्या गात्रांनी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance