येणं
येणं
तुझं येणं लाबलं की
खूपंच उदास वाटतं...
मग तुझ्या माझ्या ब्रेकअपच्या
अफवेचं पेव फुटतं...
मग आठवतो मला
तू दिलेला दिलासा ....
मग होऊन निर्धास्त
स्थिर होतो जरासा ....
तुला असतात मर्यादा ,
भेटण्याच्या आणि बोलण्याच्या,
जगाची नजर चुकवून.
सोबत चार पावलं चालण्याच्या ...
म्हणून सखे तुझी क्षणीक भेट
मी पुरवून पुरवून वापरतो ....
विरह उनाडक्या करू लागला की ,
त्याला गप्प बस म्हणून डाफरतो...
कळलंय आता मला
हेच तर असतं नातं ....
दूर असूनही दोघाचं मन
रोज रोज जवळ येतं...

