सखे
सखे
ओठांचे चुंबन नको सखे
कपाळावर ओठ तुझ्या टेकवू दे ...
दिर्घ मिठीचा नाही कसलाच बहाणा
जादूच्या झप्पीचा योग तेवढा येऊ दे ...
प्रणयाचे क्षणीक सुख नको सखे
मनाने मला तुझा होऊ दे ...
क्षणीक सुखासाठी नाहीच मी उतावीळ
तुझ्या ओठावरचा मला तिळ होऊ दे ...
तुझं माझं असं काहीच नसेल कधी
समसमान सगळं दोघांचं होऊ दे....
नात्याला नाव देऊ आता नको आडोशे
मी घोडा घेऊन येतो वाजंत्री वाजू दे ....
तू हवी सखे मला तुझं स्वातंत्र्य राखून
माझ्यातल्या पुरुषाकडून तुझी सेवा होऊ दे...
स्त्रीपुरुष समानता मानणारा मी एक
तुझ्याही ताकदीची हवा होऊ दे ....

