लेक
लेक
1 min
180
गोड गोड गोजिरवाणी लेक
जसा स्टॉबेरीचा आंबट गोड केक ...
खेळणीचा पसारा घरभर करी
भाषा कळेना बोबडीच सारी ...
पप्पा मम्मी आज्जी बाबा
एवढं आहे तोंडपाठ ...
घेऊन फिरा नाहीतर आहे माझ्याशी गाठ !!!!
मऊ भात चावी बोळके तिचे दात ..
पोरीला पाहुणच सा-या दुःखावर होते मात
क्षण तिचे हे बोळके
साठवून ठेवतील मम्मी पप्पा
परक्या घरी गेल्यावर
तिच्या आठवणीशी करतील गप्पा ..
लेक असणे म्हणजे ,
नशीबाचा भाग आहे ..
बाळा तू अंगणात फुललेली बाग आहे ...
