राणी
राणी
1 min
291
अदा तुझी जीवघेणी
सुबक अशी वेनी-फनी
मोगरा माळून अत्तरी
कुठं निघालीस राणी?
कपाळा शोभती टिकली
थोडीशी लाज़ेनं झाकली
नजरेचा मान राखण्या
माझी नजर झुकली .
पापण्यांच्या मांडवाखालची
नजर कशी पाणीदार
वाईट नजरा चुकवून
पेलतेस जवानीचा भार
ओठांच्या दोन पाकळ्या
पाकळ्या वरची तिळ
तुला मजनुंने मारावी
सुरात एक शिळ ....
नटली अशी की
अप्सरेचीच सखी
एैसी कयामत राव
आज़ तक नही देखी..
