शिल्पकार
शिल्पकार
क्रांतीचा सूर्य तो होता
अखंड देशाचा अभिमान
घटनेच्या त्या शिल्पकाराने
जन्मास घातले संविधान
अस्पृश्यतेच्या जोखडात होती वेस,
गावात उच्चवर्णीयांना होता मान..
हलकी जात वाटे तेव्हा
समाजास निच आणि घाण
भिमराव दुःखी झाले
पाहून पेटलेलं रान
घेतली मग अस्पृश्यांना
न्याय देण्याची आण
उच्चवर्णीय समजणाऱ्यांनी थोडेसे
तेव्हा टवकारले होते कान
पण बाबासाहेब उठले होते
अस्पृश्यांना देण्या सन्मान
अडाणी गरिबीने पिचलेला समाज अन्
विकला गेलाला होता स्वाभिमान
शिक्षणासाठी तयार करून
त्यांच्यात आणली भिमाने जान
देवालाही भेटण्याची नव्हती परवानगी,
माणसेच विसरले होते भान
उच्च निचतेच्या वादात
गाभाऱ्यातील देवाने झाकले डोळे आणि कान
देवाची आणि भक्तांची
मध्यस्थी केली छान
देव पाहून कैक वर्षांनी
गाभाऱ्याचे झाले मानपान
चवदार तळ्याच्या काठावर
अस्पृश्यांचा पदोपदी अपमान
उच्चवर्णीयांना वाटे स्पर्शाने
पाणी होईल घाण
चवदार तळे अस्पृश्यांना बंद
तहानेने राहिले नव्हते त्राण
उघडून सार्वजनिकरित्या बाबांनी
पाण्यावर, लिहिले सोनेरी पान
हा शिल्पकार घटनेचा
झगडला सिना तान
समूळ नष्ट केली
त्याने जातीभेदाची घाण
तरीही आजच्या घडीला
होतो जातीभेद
आजही लागलेत देवा
सर्वधर्मसमभावाचे वेध
