हल्ली
हल्ली
1 min
100
नजरेत नजरेचे घुसतात
सुसाट बाण हल्ली
हिरवं वाटतं त्याला,
ओसाड रान हल्ली .
त्याच्या तिच्या बाबतीत ,
कुजबुजतात कान हल्ली.
तपास काढत येतात
प्रेमविरोधी श्वान हल्ली
भेटतात आडोशाला दोघे
गप्प गुमान हल्ली
ती वाटते त्याला
मेरी ज्यान हल्ली
भेटतो जरी तो
तिचेच सपान हल्ली
झेलतो समाजाच्या निंदा
झाला तुफान हल्ली .
समाज सुधारला जरी
"जात" प्रमाण हल्ली
प्रेमाला संबोधून लफडं
होतो अवमान हल्ली
