कधीकाळी
कधीकाळी
आमच्याही डोक्यात कधीकाळी ,
टिकटिक वाजायची .
अन् काय सांगू ती !!
कशी लाजायची ?
ती यायची ती बघायची
एका शपथेवर ,
जोडी जगायची ...
बाग होती फुलं होती,
कानात तिच्या डुलं होती .
माझं डोकं तिची मांडी ,
चारचौघात मात्र कोंडी होती.
आडोशे गुलाबी मंतरलेले ,
चुंबानाचे श्वास होते.
माझे तिचे विरहात ,
कडक उपवास होते .
पत्रं होती, कार्डं होती .
समाजमान्यता हार्ड होती .
तरीही प्रेम तग धरून असायचे
कारण तेव्हा आतासारखे ,
अफेअर नसायचे!!
अफेअर नसायचे !!!

