STORYMIRROR

Santosh Jadhav

Romance Others

3  

Santosh Jadhav

Romance Others

गुलकंद

गुलकंद

1 min
225

भेटू परत एकदा

त्याच आडोशाला जुन्या

गेली तू तेव्हापासून

झाल्या मैफिली ग सुन्या


भरू परत ते रंग

मिलनाचे माझ्या तुझ्या

फिरू गुलाबी थंडीत

घेऊ पावसाची मजा



हात हाती अलगद

घेऊ स्पर्शून जरासे

धडधड वाढेल ती

घेऊ जरासे उसासे



मिठी उतावीळलेली

करू ग कुलूपबंद

चुंबनाने लावतो मी

तुझ्या ओठां गुलकंद



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance