ती
ती
बरंच काही आहे पण तिच्याशिवाय सगळं गौणंच की !!
ती असती तर , क्षण सोनेरी झाले असते .
चांदणे जास्तंच प्रकाशमय झाले असते.
चंद्र न झोपता आमच्या क्षणांचा साक्षीदार झाला असता .
प्रवाही नदी अचानक थबकून थांबली असती आणि
आवाक होऊन दोघांकडे खळखळ नजरेनं पाहात बसली असती .
रात्रीला चार चांद लागले म्हणून रात्र भलतीच खूश झाली असती .
विरह रूसून कोप-यात जाऊन बसला असता आणि
आम्ही दोघे हातात हात घेऊन नजरेनं नजरेला
अगदी निरखत एकमेकांना पाहात बसलो असतो ....
पण ती नाही ना राव !!!!!!

