तुला
तुला
बोलायचं राहिलं तुला
काल जोडीनं पाहिलं तुला
पाहून न पाहिल्यासारखं केलस
तुलाही जमली दुःख लपवायची कला..
आठवतं मला लख्ख सारं
बालपण, तरुणपण सगळंच प्यारं
नजर ती तुझी नजर ती माझी
बहुतेक ते गुलाबी वारं
ति शाळा तो वर्ग
तु अप्सरा अन् क्षण स्वर्ग
ती वही ती पेन
मी असा तसा, तु मुलीत मेन
तु अव्यक्त मी अव्यक्त
नजर साली, तुझीच भक्त
कळलं होतं जगाला
अफवा उठल्या फक्त
तुही विसरून गेलीस
मी दुर गेलो
त्या गेलेल्या क्षणांपूरताच
सखे तुझा झालो.
आता ही आहेस
फक्त आहेस म्हणून
तुटून परत जोडलेला
एक वेगळा भाग बनून...
