STORYMIRROR

Raakesh More

Romance

4  

Raakesh More

Romance

गिफ्ट नवं

गिफ्ट नवं

1 min
295

उद्या तूला सखे माझ्या  

घरी मी नेणार आहे 

घरच्यांना तुझ्या रूपात 

गिफ्ट नवं देणार आहे || 0 ||


सांगीन त्यांना आपल्या घरची 

भावी लक्ष्मी आहे 

आता भविष्यात आपल्याला 

काय कशाची कमी आहे 

तुझ्यासाठी सर्व सुखं 

विकत मी घेणार आहे 

घरच्यांना तुझ्या रूपात 

गिफ्ट नवं देणार आहे || 1 ||


उद्या तुझ्या हक्काचं 

घर तूला दाखवतो 

सर्व सुख समृद्धीला 

तुझ्यापुढे वाकवतो 

सांगीन त्यांना घराची 

मालकीण येणार आहे 

घरच्यांना तुझ्या रूपात 

गिफ्ट नवं देणार आहे || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance