मी अन् तू
मी अन् तू
मी व्हावे अळवाचे पर्ण
तू दवबिंदू होऊन यावे,
विसावुनी पर्णपटलावर
अन् अलगद मज चुंबावे.
मी व्हावे तेजोमय दीप
तू ज्योत होऊन यावे,
छेदूनी तिमिराला अन्
मंद प्रकाशाने उजळावे.
मी व्हावे श्यामल मेघ
तू जलधारा होऊन यावे,
वारयासंगे करीत मस्ती
धुवांधार अन् बरसावे.
मी व्हावे वेडा भ्रमर अन्
तू फूल सुगंधी होऊन यावे,
तुजभोवती घालित पिंगा
प्रेमगीत अन् गुणगुणावे.
मी व्हावे धवल चंद्रमा
तू चांदणी होऊन यावे,
रात्रीच्या नभांगणी अन्
मजसवे तू ही चमकावे.