STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

4  

JYOTI GOLE

Others

स्वप्नीही नव्हते माझ्या

स्वप्नीही नव्हते माझ्या

1 min
328

मम अधरी तुझे गीत

गंधाळल्या आठवणी,

का लागे तुझाच ध्यास

माझ्या मना रात्रंदिनी?


कोणती अपूर्व जादू

स्वप्निल तुझ्या नेत्री?

मारीता नयनबाण तू

गेलो मी फुलून गात्री


अभिमान मज होता

मम संयमी मनाचा,

मात्र पाहिले तुजला

राहिलो न स्वतःचा


नकळत फुलली मनी

ही अबोल प्रीतभावना,

कळवू तुला कशा ग

मी हृदयीच्या संवेदना?


स्वप्नीही नव्हते माझ्या

की घडेल असे काही,

सखे पाहाताच तुजला

असे हरवेन हृदय मीही


Rate this content
Log in