STORYMIRROR

JYOTI GOLE

Others

3  

JYOTI GOLE

Others

माझी मराठी मराठी

माझी मराठी मराठी

1 min
212

माझी मराठी मराठी 

माया तिची अपरंपार

माझ्या मराठीचे तेज

जणू तलवारीची धार


माझी मराठी मराठी 

काय वर्णू तिचे गुण

कसे व्हावे उतराई

कसे फिटतील ऋण


माझी मराठी मराठी 

सुंदर साहित्याची खाण

नसे काही उणे मराठीत 

मराठीची महती जाण


माझी मराठी मराठी 

गुंजे संतांची संतवाणी

माझी मराठी मराठी

धरा मराठीची कास

शिका जरी परकी भाषा

धरा मराठीचा ध्यास


माझी मराठी मराठी

रूप तिचे अभिजात

माझ्या मराठीचा नारा

घुमू दे सारया जगतात


Rate this content
Log in