अनुभवलाय मी पाऊस
अनुभवलाय मी पाऊस
1 min
369
अनुभवलाय मी पाऊस....
वादळी गडगडणारा
वीजेसोबत लकाकणारा
कागदी होड्यांचा
अन् वेचलेल्या गारांचा
गावशिवारातला
अन् टोलेजंग शहरातला
सारे वाहून नेणारा
होत्याचे नव्हते करणारा
हलक्या श्रावणसरींचा
हरिततृणांच्या मखमालीचा
हाती छत्री असताना
अन् हातात छत्री नसताना
गरीबाच्या झोपडीतला
अन् श्रीमंतांच्या बंगलीतला
अनुभवलाय मी पाऊस....
तू सोबत असताना
अन् तू सोबत नसताना
दरवर्षी नेमाने येणारा
अन् तुझी आठवण देणारा
